Vastu Products

|| वास्तु उंबरठा ||

✨ उंबरा! ✨

उंबरा म्हणजे लाकडी दाराच्या चौकटीत खालच्या बाजूस बसविलेले जाड, रुंद आणि सपाट लाकूड. दाह शमन करणारा आणि दीर्घकाळ पाण्यात टिकून रहाणारा वृक्ष म्हणजे (औदुंबराचा)उंबराचा वृक्ष. म्हणूनच पूर्वीच्या काळात घराचा उंबरा हा उंबराच्या खोडापासून बनत असे. या वृक्षाच्या नावावरुनच दाराच्या चौकटीत बसवायच्या या लाकडाचं नाव उंबरा असे पडले असावे. उंबराचा वृक्ष हा कृतिका नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे आणि त्याच्या औदुंबर या नावाने त्याला शुभ असे धार्मिक अधिष्ठानही प्राप्त झालेले आहे.

साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे. २१ गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरु माऊली दत्तांनी साधना केली. औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील. तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील. या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होते.

काही वर्षे पाठीमागे गेल्यास घरातील गृहिणी रोज सकाळी उंबऱ्याची पुजा न चुकता करायची. उंबरठ्यावर नृसिंहलक्ष्मीचे स्थान असते. तर चौकटीवर गणेशाचे स्थान असते. घरात कोण, कसे,काय घेऊन जातेय त्यावर त्याचे ध्यान असते.

उंबरा म्हणजे आत्मभान जागृत ठेवणारं स्थान.उंब-याबाहेर पडल्याशिवाय जग काय आहे हे कळत नाही हे म्हणतात ते अगदी खरं आहे. उंबरठे झिजवल्या शिवाय यश पदरात पडत नाही हे सुद्धा खरंच. पण उंबरठे झिजवताना आपल्यावर आपल्या उंब-याने केलेले संस्कार लक्षात ठेवले तर निसरड्या जागांचा सामना करणं सोपं होत असतं. अजून एक गोष्ट इथे नमूद करायलच हवी. ती म्हणजे उंब-याच्या बाहेर पडण्यासाठी फार मोठं धैर्य लागतं आणि बाहेरच्या जगात वावरण्यासाठी मर्यादेचं फार मोठं भान लागतं. हे भान जे कोणी जपतं त्याचं आयुष्यात नेहमीच सुंदर होत असतं.

उंबरा म्हणजे लक्ष्मण रेषा. जे जे अपवित्र असेल,वाईट असेल त्या वस्तू असतील,विचार असतील त्यांना उंबऱ्याच्या आता थारा नाही. मग ते काहीही असु शकते. भ्रष्टाचाराचा पैसा असेल,कुलक्षणी मित्र असतील,व्यसनांसाठी लागणारे साहित्य असेल,वाईट विचार असतील त्यांना उंबऱ्याच्या आत स्थान नाही. म्हणूनच जे वाईट प्रवृत्तीचे कोणी आले तर उंबऱ्याच्या बाहेरूनच निरोप दिला जायचा. म्हणून पुर्वीच्या घरांना ओसऱ्या असत. चहापाणी, गप्पा बाहेरच व्हायच्या. घरातील गृहलक्ष्मीला सुद्धा कधी बाहेर जायचे आणी कधी नाही हे कोण आलंय याचे भान असायचे. आता काय भावोजी भावोजी करत असेल त्या अवतारात बाहेर. घरातील संस्कार, जेष्ठांचे वर्तन, मुलांचे वळण हेच त्या घराचे व्यक्तीमत्व ठरवते. उंबरा म्हणजे मर्यादा. जशी नदीला दोन काठांची मर्यादा असते,सागराला किनाऱ्याची मर्यादा असते तसेच घराला उंबऱ्याची मर्यादा असते. ज्यावेळी नदी,सागर मर्यादा ओलांडतात तेव्ह जलप्रलय येतो. तसेच उंबऱ्याची मर्यादा ओलांडली की कुटुंबावर संकट ठरलेले आहे.
म्हणूनच आपण आपली संस्कृती जपली तर पुढील पिढी त्यातून आदर्श घेईल. एकुणच काय मर्यादा प्रभू श्रीरामांनी पाळली,आपण ती ध्यानात ठेऊ, उंबरा ओलांडताना मर्यादेचं भान ठेऊ.

आमच्याकडे चार प्रकारचे उंबरठे मिळतील!

१. औदुंबर

२. देवदार

३. खैर

४. साग

✨ गुढीपाडव्यानिमित्त खास ऑफर!! ✨

उंबरठ्यासोबत काय मिळते?

प्रत्येक उंबरठ्यासोबत पाच प्रकारचे रत्न तसेच गोमती चक्र , स्वस्तिक यंत्र पट्टी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वनस्पतीची पावडर जेणेकरून तुमच्या घरामध्ये कुठलीही वाईट शक्तीचा शिरकाव होणार नाही आणि सुख शांती समृद्धी लाभेल.

आपल्या दरवाजाच्या साईजनुसार उंबरठा तयार केला जातो उंबरठ्याच्या लांबी रुंदी नुसार किंमत ठरली जाते ऑर्डर दिल्यानंतर 7 दिवसात आपल्या पर्यंत उंबरठा तयार करून कुरिअर केला जातो या उंबरठ्यावर पावलांची डिझाइन लेझर मशीनवर केली जाते त्यामुळे उंबरठ्याचे माप महत्वाचे आहे ऑर्डर बुक करताना संपूर्ण पेमेंट आधी घेतले जाते आपण दिलेल्या पत्त्यावर उंबरठा पाठविला जातो.आपल्या कारपेंटर कडून आपण उंबरठा बसवून घ्यायचा आहे कुरिअर चार्ज आपणास द्यावा लागणार आहे.

मोफत शिपिंग

आता खरेदी करा आणि मोफत शिपिंगचा लाभ घ्या!

३० दिवसांचा परतावा

आम्ही ३० दिवसांचा परतावा धोरण प्रदान करतो.

सर्वोत्तम ऑफर

तुमच्यासाठी सर्वोत्तम ऑफर, मर्यादित कालावधीसाठी!

सुरक्षित पेमेंट

सुरक्षित व्यवहार, आनंदी खरेदी!

Shopping Cart